बंद
    • जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड

      जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड

    जिल्हा न्यायालयाबद्दल

    नांदेड हे महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर वसलेले आहे. हे शीख गुरुद्वारांसाठी प्रसिद्ध आहे. १७०८ मध्ये, औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या वर्षी, शिखांचे दहावे आध्यात्मिक गुरु गोविंद सिंग नांदेड येथे आले. येथे त्यांनी आपला देह सोडला. त्यांनी स्वतःला शेवटचे जिवंत गुरू घोषित केले आणि शिखांचे शाश्वत गुरू म्हणून गुरु ग्रंथ साहिबची स्थापना केली व तेंव्हापासुन गुरु ग्रंथसाहीब यांचा आदर जिवंत गुरूंप्रमाणे आहे. त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे. महाराजा रणजित सिंग यांच्या देणगीतून नांदेड येथे १८३५ च्या सुमारास एका सुंदर गुरुद्वाराचे बांधकाम झाले. गुरुद्वारामध्ये किचकट कोरीवकाम आणि चित्तथरारक सुंदर कलाकृती असलेला एक आकर्षक सोनेरी घुमट आहे. हे श्री हुजूर अबचलनगर सचखंड गुरुद्वारा म्हणून ओळखले जाते.

    नांदेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील दुसरे मोठे शहर आहे. नांदेड हे जिल्ह्याचे मुख्यालय असून येथे केंद्र व राज्य शासनाची अनेक कार्यालये आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्हे येतात. आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प गोदावरी नदीवर बांधला गेला आहे. या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

    अधिक वाचा
    Chief_Justice
    मुख्य न्यायमूर्ती मा. मुख्य न्यायमुर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय

    माननीय मुख्य न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई

    Hon'ble Justice Shri Nitin B. Suryawanshi
    प्रशासकीय न्यायमुर्ती माननीय न्यायमुर्ती श्री नितीन बी. सुर्यवंशी

    माननीय प्रशासकीय न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई.

    JUSTICE SHAILESH P. BRAHME
    प्रशासकीय न्यायमूर्ती मा. प्रशासकीय न्यायमुर्ती शैलेश पी. ब्रह्मे

    माननीय प्रशासकीय न्यायमुर्ती, उच्च न्यायालय, मुंबई.

    प्रतिमा नाही
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कौसमकर एस.एस.

    प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड

    कोणतीही पोस्ट आढळली नाही

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा